New Inmarathi

मुलं “अशी” घडतात: पालक – शिक्षकांसाठी एक धडा! | अजित करकरे | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन

आदर्श समाज एक परफेक्ट समाज हे तसं दिवा स्वप्न आहे. कारण कुठलाही दोष नस असलेला पूर्ण परिपक्व झालेला समाज कधीच अस्तित्वात येणे शक्य नाहीये. परंतु असा समाज घडवण्याची खटपट, असा समाज घडवण्याचे प्रयत्न सतत करत राहायला हवेत.  

या प्रयत्नांमधूनच आपण एक उत्तम समाज सतत घडवत जातो, पण ही खटपट करायची कोणी? सगळं सरकार शासन प्रशासनावर सोडून द्यायचं का? अर्थातच नाही समाजातून आपण घडतो आणि आपल्यातन समाज घडत असतो. आपण लहानाचे मोठे होत असताना आपलं कुटुंब, आपला मित्रपरिवार आपले नातेवाईक आणि आपली शाळा आपल्याला घडवत जाते.  

एक आफ्रिकन म्हण आहे It Takes a village to raise a child, म्हणजे एक मूल उत्तम प्रकारे घडवण्यासाठी खेड्याने प्रयत्न करायला हवे असतात. खेड्याने म्हणजे आजूबाजूच्या समाजाने आणि शाळा ही ते खेडं तो समाज घडवणारी यंत्रणा असते. पण हे सगळं बोलायला ठीक आहे शाळा चालवणं म्हणजे काही खाऊचं काम नाहीये.  

खूप मोठा प्रकल्प असतो तो, सर्वांनाच ते झेपत नाही पण काहींना असा प्रकल्प घडवता येतो, रुजवता येतो आणि फक्त ते तिथेच न थांबता त्यातून एक मॉडेल तयार करतात. 25 वर्षांपूर्वी श्री अजित करकरे सरांनी असंच एक मॉडेल तयार करायचं स्वप्न बघितलं आणि ते मॉडेल आज खूप चांगल्या प्रकारे रुजलंय आणि डोंबिवली मध्ये ‘गुरुकुल द डे स्कूल’ नावाने प्रसिद्ध आहे.  

या मॉडेलवरच आपल्याबरोबर चर्चा करायला, पिढ्या कशा घडवल्या जातात मुलं कशी घडवली जातात हे आपल्याला समजून सांगायला  

अजित करकरे सर यांनी स्वतः या पॉडकास्टवर हजेरी लावली. मुलांना शाळा आवडावी – यासाठी काय करावं? मुलांना शिक्षक आपलेसे वाटावेत यासाठी काय करावं? पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे कसं बघावं – कसा आणि किती सहभाग घ्यावा? हे प्रश्न बदलत्या काळानुसार प्रकर्षाने समोर उभे रहात आहेत. 

या आणि अश्याच अनेक मूलभूत, महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं श्री अजित करकरे सरांनी इनमराठी मंथनच्या या पॉडकास्टमध्ये दिलेली आहेत. हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही येथे व इनमराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता!