ड्रीम जॉब कसा मिळवावा? प्रमोशन कसं मिळतं? | रविंद्र पवार | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन | InMarathi
एक सामान्य मराठी मध्यमवर्गीय माणूस जन्मभर पाच प्रश्नांभोवती फिरत असतो. मला नोकरी कशी लागेल? माझा पगार कसा वाढेल? मी ऑफिस पॉलिटिक्स कसं मॅनेज करू? मला प्रमोशन कसं मिळेल? आणि शेवटी मी नोकरी कशी बदलू?
खरंतर मध्यमवर्गीय या पाच प्रश्नांभवती घुटमळत असतो त्यामुळे बघायला गेलं तर या पाच प्रश्नांची उत्तरं आतापर्यंत सापडली असायला हवी होती आणि सापडलेली उत्तरं सर्वांपर्यंत रुजायलासुद्धा हवी होती पण किमान मराठी कम्युनिटी मध्ये हे झालेलं दिसत नाही आणि मदत करायला कोणी चेहरा दिसत नाही मग आपण गडबडतो गोंधळतो आपल्या मोठ्या बहिण भाावांना विचारतो काका काकूंना विचारतो त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवानुसार सदहेतूनी उत्तर येतात, आपण त्या उत्तरांवर अंमलबजावणी करतो आणि चाचपडत चाचपडत मार्ग शोधतो पण असं चाचपडणं गरजेच आहे का?
Can you not find a systematic solution? Can you not find answer to these five question? या पाच प्रश्नांची उत्तरं तसेच या पाच प्रश्नांची उत्तर शोधत असताना त्याच्याच काही उपप्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक सच्चा मराठी माणूस या प्रश्नाची उत्तरं शोधत बाहेर पडला आणि त्याला त्या प्रश्नाची उत्तरं सापडलीसुद्धा आणि आता तो मराठी माणूस इतर मराठी जनांना त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या करियरमध्ये ग्रोथ मिळवण्यास मदत करतोय आणि हा मराठी माणूस म्हणजे रविंद्र पवार.
या पॉडकास्टमधे रविंद्र सरांनी अनेक मूलभूत मुद्यांवर मार्गदर्शन केलं आहे. हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही इनमराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता!