New Inmarathi

रहमानचा फॅन ते रहमानचा गीतकार: एक अचाट प्रवास | विक्रम एडके | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन

चतुरस्त्र व्यक्तिमत्व चतुरस्त्र व्यक्ती हे आपण बरेचदा ऐकत असतो आणि असे हरहुन्नरी लोक खूप काही कमावून बसल्यानंतर, त्यांनी कर्तुत्व गाजवल्यानंतर ते खूप प्रसिद्ध होतात आणि मग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आपल्याला माध्यमांमधून, त्यांच्या चरित्रांमधून, बातम्यांमधून मुलाखतीमधून कळायला लागतात! फार क्वचित असं होतं की आपल्या आजूबाजूला एखादं व्यक्तिमत्व स्वतःला कॉन्शियसली घडवत असतं आणि आपल्याला हे जाणवतं की, “यार ये बंदा कुछ कर रहा है, ये बंदा कुछ अलग करने वाला है, ये बंदा कुछ अलग होने वाला आहे है!”  

अशा व्यक्तिमत्वांबरोबर गप्पा मारता येणं अशा व्यक्तिमत्वांबरोबर त्यांचा प्रवास समजून घेता येणं आणि ते त्यांचा प्रवास कॉन्शसली कसा घडवतायत कसा आखतायत यातून आपण शिकणं हे जमायला नशीब लागतं. तर अशाच एका पाहुण्याने नुकत्याच इनमराठी मंथन या पॉडकास्टवर हजेरी लावलीये अन् ते म्हणजे प्रसिद्ध व्याख्याते आणि गीतकार विक्रम एडके. 

चित्रपट, संगीत, गाणी या सगळ्यांच्याच आविडीच्या गोष्टी! कलेला कोणतेही आयाम नसतात. पुलंच्या भाषेत सांगायचं झालं, “तर कला माणसाला कसं व का जगायचं हे शिकवत असते”. उत्तम कलावंत कोण? तर ज्याला आतला आवाज ओळखून त्यावर काम करता येतो तो. कलेमागचं टेक्निक शिकता येऊ शकेल, पण कला ही अंगभूतच असावी लागते.  

गीतकार, लेखक विक्रम एडके यांनी चित्रपटांकडे, गाण्यांकडे एका नव्या चष्म्यातून बघण्याचा दृष्टिकोन आजच्या भागात दिलाय, हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही येथे व इनमराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता!