लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि हिलिंग : वास्तव की छद्मविज्ञान | काशीमणि योगिनी | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन
यशस्वी व्हायच असेल तर मेहनत घ्यावी लागेल. मग श्रीमंत व्हायचंय हेल्दी व्हायचय, रिलेशनशिप सक्सेसफुल करायचे आहे हे काही का असे ना तुम्हाला मेहनत करावीच लागते हा बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या ज्या काही यशाच्या व्याख्या आहेत त्या साध्य करायला प्रयत्न केलेले आहेत.
If you don’t believe in yourself, If you think you can be successful तर नक्कीच यश मिळवणं अवघड होणार आहे म्हणजे माझ्यात ती कपेबिलिटी तरी आहे हा भरोसा स्वतःवर असायला पाहिजे. हा विश्वास असायला हवा आणि मला जे काही साध्य करायचं आहे ते साध्य करण्यापर्यंत
मी जाऊ शकतो हे स्वतःला सांगता यायला हवं. पण या पलीकडे एक वेगळी अशी फिलॉसफी आहे जी आपल्यापैकी बहुतेकांसमोर द मॅनिफेस्टेशन नावाच्या कन्सेप्टमधून आली की Just believe that you already there! आणि या फिलॉसफीचा अनेकांना फायदाही झाल्याचा दिसतो, पान अशा फिलॉसफीवर प्रश्नही बरेच निर्माण होतात आणि या फिलॉसफीवर काम करून इतरांना लाभ मिळवून देणारे ट्रेनर्स सुद्धा अनेक आहेत. त्यांना ते प्रश्न विचारले जातात!
त्याच धरतीवर अशा काही टेक्निक्स आहेत ज्यांचा वापर करून हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्स, वर मूलभूत काम करून हवं ते साध्य केलं जाऊ शकतं असं दाखवणारे लोक आहेत आणि आज आपल्याबरोबर या संपूर्ण यशस्वी होण्याच्या पद्धतीवर चर्चा करायला योगिनीजी यांनी या पॉडकास्टवर हजेरी लावलीये. हा पॉडकास्ट तुम्ही इनमराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता!