स्पर्धा परीक्षेतील अपयशातून घडवलं यशस्वी करिअर | अॅड. सौरभ गणपत्ये | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन
आपल्या सर्वांचे काही रोल मॉडेल्स असतात, काही आयकॉन्स असतात ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते. आपल्या कठीण काळात ज्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा मिळते, जर दिशाहीन झाल्यासारखं वाटत असेल तर दिशा मिळते, पण बरेचदा काय होतं हे रोल मॉडेल्स इतके लार्जर दन लाईफ असतात त्यांनी त्यांच्या जीवनात इतकं काहीतरी अचिव्ह केलेल असतं की त्यातून आपल्याला रिलेटेबल वाटेल असा मार्ग त्यातून सापडणं थोडं कठीण जातं.
विराट कोहली काय कमाल खेळतो, ग्राउंडवर त्याचं अग्रेशन किती सुरेख दिसतं मानसिक दृष्ट्या किती मजबूत आहे हे सगळं आपल्याला दिसत असतं आपल्याला ते भावत असतं पण, विराट कोहलीने त्याच्या जीवनात जे काही अफाट अचिव्ह केलंय आणि ते करण्यासाठी त्यानी जो झगडा दिलाय तो आपल्याला कधी कधी आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रॉब्लेम समोर फार मोठा वाटतो आणि म्हणून त्यातून ऍक्शनेबल प्रेरणा मिळणं कधीकधी कठीण जातं.
त्यामुळेच आपण असे मोठे लार्जर दॅन लाईफ रोल मॉडेल्स ठेवत असतानाच आपल्या आजूबाजूला आपल्या जीवनाला निगडित असलेले आपल्यासारखेच जीवन जगणारे जशी फाईट मारतायत आणि त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येतंय हे
सुद्धा बघायला पाहिजे म्हणजे आपले काका, मामा, मावशी, आत्या, आपला मोठा भाऊ, ताई हेसुद्धा अनेक संकटना सामोरे गेलेले असतात. मग त्यांनी कोणतं मेंटल फ्रेमवर्क वापरलं? त्यांनी कठीण काळामध्ये नेमकं काय फेस केलं? त्यावेळी त्यांची मानसिक अवस्था काय होती? त्यांनी कोणती एक्शन घेतली? हे आपण शिकावं म्हणजे आपल्याला ते replicable आणि applicable वाटतं.
आपल्या इनमराठीच्या या नव्या पॉडकास्टमध्ये आपण अशाच एका पाहुण्यांबरोबर बोलणार आहोत ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये या सर्वांच्या जीवनात जसे चढ उतार असतात असे अनेक चढ उतार त्यांनी सहन केलेत आणि त्यामधून त्यांनी त्यांच्या करिअरला फार चांगली सर्वांना आदर्श वाटेल सर्वांना त्यातून काहीतरी शिकता येईल अशी गती गाठली आहे. सोशल मीडियावर त्यांनी स्वतःच्या लाईफला शेप देत असतानाच सोशल मीडियावर एस्पेशली Facebook वर अनेक तरुण तरुणींना जे कन्फ्युज आहेत त्यांना सुद्धा क्लॅरिटी मिळवून देण्यात मदत केली आहे असे अॅड. सौरभ गणपत्ये यानी या पॉडकास्टवर हजेरी लावली.
अॅड. सौरभ गणपत्ये यांनी देखील स्पर्धा परीक्षेतील अपयशातून एक अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायक करिअर घडवलं आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी ‘इनमराठी मंथन’च्या या पॉडकास्टमध्ये रंगतदार गप्पा झाल्या आहेत. हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही येथे व इनमराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता!