IT क्षेत्रात AI मुळे घडणारं स्थित्यंतर कसं असेल?! | सचिन दीक्षित | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन
सापांचा आणि गारुड्यांचा देश म्हणून प्रसिद्ध असलेला भारत गेल्या २० ते २५ वर्षात इतका पुढे आला की आज तो जगातल्या टॉप ५ इकॉनॉमीज पैकी एक झालाय हे भारतीयांना जमवून आणता आलं वेगवेगळ्या कारणांमुळे. भारतीयांनी आपल्या स्ट्रेंथ्स वापरल्या आणि म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलोय पण त्यातला असा कुठला एक फॅक्टर होता ज्यामुळे हे सगळं फार चटकन घडलं किंवा इतर सर्व फॅक्टर्सना मदत करू शकला असा टॉप मोस्ट फॅक्टर कुठला होता तर तो अर्थातच निर्विवाद आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं सेक्टर.
IT नी ९० च्या दशकात भारतात जी काही क्रांती घडवून आणली त्यातून ज्या इकॉनॉमिक होरायझोन ओपन झाल्या आणि त्यानंतर भारतीय इकॉनॉमीने जी मुसंडी मारली ती अद्वितीय आहे. पण Ever Evolving Field असं आयटीला जे म्हणलं जातं ते आता अशा टप्प्यावर आलंय की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भरमसाठ वापर होऊन ज्या सेक्टरनी ज्या फिल्डने भारतात रोजगाराच्या अनंत संधी निर्माण करून दिल्या आणि त्याचा डोमिनॉर इफेक्ट होऊन इतर अनेक दुयम रोजगार निर्माण झाले त्या सेक्टरच आता बेरोजगारीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय!
पण हे खरंच तसं आहे का? आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्यासमोर काहीतरी वेगळंच उभं राहणार आहे का? २५ वर्षांपूर्वी जी पिढी आयटीमध्ये मुसंडी मारून रुजली आणि ज्या पिढीनी भारतात अमर्याद ऐश्वर्य आणलं ती पिढी आज या संकटाला कसं हाताळणार आहे? कारण ते आता सीनियर झालेत आणि त्यांच्यासमोर वेगळ्या प्रकारचे वेगळे चॅलेंजेस आहेत यावर आपण फार गांभीर्याने चर्चा करायला हवी आणि ही चर्चा करण्यासाठी सीनियर मार्गदर्शक सचिन दीक्षित यांनी या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आहे.
“आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जाणार” ही भीती सार्वत्रिक झाली आहे. भारतासारख्या इकॉनॉमीसाठी AI हे अधिकच मोठं संकट आहे. कारण आपली मदार जगभरात “स्वस्त मनुष्यबळ” पुरवण्याच्या – आऊटसोर्सिंग करण्याच्या – व्यवसायावर अवलंबून आहे. IT industry त्यावरच उभी आहे आणि त्यातूनच भारत महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे.
मग जर ५०० “रिसोर्सेस” एक वर्ष जे काम करतात ते १ माणूस AI वापरून १ दिवसात किंवा फार फार तर एका महिन्यात करू शकत असेल… तर आपल्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं काय होणार – हा प्रश्न अतिरंजित नाही…!
म्हणूनच IT ने भारताला दाखवलेलं सुवर्णयुग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे संकटात सापडलं आहे ही धारणा काही चुकीची नाही.
आणि म्हणूनच AI ची त्सुनामी आपल्या आय टी मधे काय काय घेऊन येते आहे आणि काय काय उध्वस्त करत आहे हे व्यवस्थित समजून घ्यायला हवं – तेही अश्या कुणाकडून तरी – ज्याला यातलं खरंच कळतं! And we have just the person for this!
भारतात आज बँकिंग क्षेत्रात वापरलं जाणारं मूळ बॅकबोन फ्रेमवर्क तयार करण्यात सिंहाचा वाटा असलेले सचिन दीक्षित सर! सचिन सरांनी या २ तासांत एआय, स्टार्ट अप, टेक्निकल एज्युकेशन आणि जाता जाता जेन झी अशी चौफेर बॅटिंग केली आहे. हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही इनमराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता!